Jagdish Patil
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांना मुंब्रा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आव्हाडांनी 24 ऑक्टोबर रोजी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. या रॅलीत शरद पवार देखील सहभागी झाले होते.
उमेदवारी अर्ज भरताना आव्हाडांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं, त्यामधून त्यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार आव्हाडांच्या एकूण संपत्तीमध्ये 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये मोठी वाढ झाली आहे.
त्यांच्याकडे BMW, होंडी सिटी अशा आलिशान गाड्या आहेत.
तर नाशिक सिन्नर येथे शेतजमीन आणि ठाण्यातील येऊर येथे बंगला, गाडीचे शोरुम, विवियाना मॉल येथील बंगल्यासह शॉप देखील त्यांच्या नावावर आहेत.
2019 मधील संपत्ती 47 कोटी 87 लाखांवरून ती 2024 मध्ये 83 कोटी 14 लाख रुपये इतकी झाली आहे.
यामध्ये स्थावर मालमत्ता 42 कोटी 99 लाख तर जंगम 40 कोटी 15 लाख रुपये इतकी आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर 17 गुन्हे दाखल असून 28 न्यायप्रविष्ट प्रकरणे आहेत.