Ganesh Sonawane
महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आता सभागृहात कामकाजासाठी आणि विशेषतः स्थायी समितीवर सदस्य पाठवण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी करणे अनिवार्य असते.
स्थायी समिती ही मनपाची 'तिजोरी' मानली जाते. तिथे सदस्य पाठवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते.
पालिकेच्या एकुण संख्याबळानुसार काही सदस्यांना सदस्य म्हणून स्थायी समितीवर घेतले जाते. त्यांच्यातून सभापतींची निवड केली जाते. हे पद मिळवण्यासाठी रस्सीखेच असते.
नगरसेवकांना मनपा आयुक्तांकडे आपला गट नोंदवावा लागतो.
निर्वाचित सदस्यांनी एकत्र येत गट नेता निवडणे आवश्यक असते.
गटनेत्याने निवडून आलेल्या सदस्यांची यादी, त्यांच्या स्वाक्षऱ्या आणि पक्षाच्या अधिकृत पत्राच्या आधारे विभागीय आयुक्तांकडे सादर करावी लागते.
मनपा सभागृहात मान्यता मिळाल्यानंतर त्या नेत्याला 'गटनेता' म्हणून दर्जा मिळतो.
स्थायीवर सदस्यांची निवड ही संबंधित पक्षाच्या सभागृहातील संख्याबळावर अवलंबून असते.
ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक, त्या पक्षाचे जास्त सदस्य स्थायी समितीवर निवडून जातात.