सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडणार आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये एका मतदाराला तीन ते चार मतं द्यावी लागणार आहेत. बहुसदस्यीय आणि एकसदस्यीय पध्दत नक्की काय आहे समजून घेऊ...
दोन जागा ('अ' आणि 'ब') असलेल्या प्रभागात एका मतदाराने एकूण तीन मते देणे अपेक्षित. एक मत नगरअध्यक्ष; तर दोन मते नगरसेवक पदासाठी द्यावे लागणार आहेत
तीन जागा ('अ', 'ब' आणि 'क') असलेल्या प्रभागात एका मतदाराने एकूण चार मतं देणे अपेक्षित असेल तर एक मत नगरअध्यक्ष; तर तीन मते नगरसेवक पदासाठी द्यावे लागतील
नगरअध्यक्षपदासाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी असणार आहे.
सदस्यपदांसाठीच्या मतपत्रिकांचे रंग असे असतीलः अ' जागेसाठी पांढरा, 'ब' जागेसाठी फिका निळा आणि 'क' जागेसाठी फिका पिवळा असणार आहे,
एका मतदाराने दोन मतं देणे अपेक्षित असेल. एक मत नगरअध्यक्ष; तर एक मत नगरसेवक पदासाठी द्यावे लागणार आहे.
नगरअध्यक्षपदासाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी; तर नगरसेवक पदासाठीच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा असणार आहे.