Jagdish Patil
सर्दी, ताप, खोकला किंवा अंगदुखी अशा आरोग्यविषयक तक्रारी जाणवल्यास आपण डॉक्टरांचा सल्ल्याने औषधं घेतो.
तर डॉक्टरांकडून लिहून दिल्या जाणाऱ्या अशाच एका औषधावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेत सरकारने 'निमसुलाइड'च्या 100 मिलीग्रामपेक्षा जास्त डोस असलेल्या निमसुलाइड औषदांवर बंदी घातली आहे.
या औषधाचं 100 मिलीग्रॅमपेक्षा जास्त सेवन आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
या अधिसूचनेत म्हटलंय की, निमेस्युलाईडचं प्रमाण 100 मिलीग्रॅमपेक्षा जास्त असणाऱ्या औषधांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
याला पर्यायी औषधं उपलब्ध असल्यामुळे निमेस्युलाईडचं प्रमाण जास्त असणारी औषधं निर्माण करणं, विक्री आणि वितरित करण्यावर बंदी घालण्यात येत आहे.
तज्ञांच्या मते, पेनकिलर औषधांच्या अतिवापरामुळे केवळ यकृतच नाही तर मूत्रपिंडावरही वाईट परिणाम होऊ शकतात.
त्यामुळे कोणतेही वेदनाशामक औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केलं आहे.
तर या औषधावर बंदी घालण्याची शिफारस ICMR नं केंद्र केली होती. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.