Municipal Election : उमेदवारांनी अर्ज दाखल करताना यंदा प्रथमच लिहिले निबंध, घेतली AI ची मदत

Ganesh Sonawane

अर्ज दाखल केले

राज्यात २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

Municipal Election Essay Writing | Sarkarnama

पालिका निवडणूक

राज्य निवडणुक आयोगाकडून पालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करताना यंदा शहर विकासावर ५०० शब्दांचा निबंध लिहून देणे बंधनकारक केले होते.

Municipal Election Essay Writing

निबंध

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांनी केवळ अर्जच भरला नाही, तर 'शहर विकासावर' लिहिलेला निबंध देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

Municipal Election Essay Writing

AI चा केला वापर

विशेष म्हणजे इच्छुकांनी शहर विकासाचे व्हिजन मांडण्यासाठी लिहिलेला निबंध हा थेट एआयच्या आधारे कॉपी पेस्ट केल्याचे समोर आले आहे.

Municipal Election Essay Writing

वकिलांकडूनच घेतले लिहून

उमेदवारी अर्जातील तांत्रिक बाबी लक्षात घेता बहुतांश उमेदवारांनी आपला अर्ज वकिलांकडूनच पूर्ण भरुन घेतला होता. निबंधही वकिलांकडूनच लिहून घेतला आहे.

Municipal Election Essay Writing

प्रभाग भयमुक्त करणार

प्रभाग स्वच्छ करणे, अतिक्रमण हटविणार, प्रभाग भयमुक्त करणार, पाण्याचे व्यवस्थापन करणार असे प्रामुख्याने या निबंधांमध्ये लिहिलेले आढळते .

Municipal Election Essay Writing

पाण्याची गळती

अनेक भागांमध्ये पाण्याची गळती, निकृष्ट पाईपलाईन यामुळे नागरिक त्रस्त त्यावर उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर काहींनी सूचवला आहे.

Water Conservation Day

वर्षा जलसंधारण

झिरो वॉटर वेस्टेज प्रणाली आणि वर्षा जलसंधारणासारख्या कल्पना मांडल्या आहेत.

Municipal Election Essay Writing

अतिक्रमण हटवू

तसेच निवडून आल्यास प्रभागातील अतिक्रमण हटवून त्या जागा सार्वजनिक उपयुक्तेसाठी वापरु असे काहींनी स्पष्ट केले आहे.

Municipal Election Essay Writing | sarkarnama

NEXT : शिंदे-फडणवीसांची राज्यभर कुस्ती पण 'या' आठ महापालिकांमध्ये दोस्ती! वाचा संपूर्ण यादी

Shiv Sena–BJP Alliance | sarkarnama
येथे क्लिक करा