Rajanand More
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधर मोहोळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सहकार आणि नागरी हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री आहेत.
मंत्री मोहोळ यांनी 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडील रोख रक्कम 9,192 रुपये तर पत्नीकडे 12,124 रुपये होती.
बँकेतील एफडीआर मुदत ठेवी आणि बचत खात्यासह सर्व इतर प्रकारच्य ठेवी, वित्तीय संस्था, बँकेतर वित्तीय कंपन्या आणि सहकारी संस्था यामधील ठेवी व अशा प्रत्येक ठेवीची रक्कम (स्वत:, पत्नी व दोन्ही मुली) एकूण – 70,06,151.12 रुपये.
बंधपत्रे, ऋणपत्रे/शेअर्स यामधील गुंतवणुकीचा आणि कंपन्या/ म्युच्युअल फंड व इतर यांमधील युनिटांचा तपशील व रक्कम (स्वत: व पत्नी) एकूण – 7,96,018 रुपये.
कोणतीही व्यक्ती किंवा भागीदारी संस्था, कंपनी, न्यास, इत्यादींसह संस्था यास दिलेली वैयक्तिक कर्ज/आगाऊ रकमा आणि ऋणकोकडून इतर प्राप्त देणी आणि रक्कम – 3,96,43,686 रुपये.
टोयोटा इनोव्हा क्रीस्टा कंपनीची 22,14,382 रुपये किंमतीची मोटार. तर स्वत:, पत्नी व दोन्ही मुलींकडे मिळून एकूण 29,45,235 रुपयांचे सोन्याचे दागिने.
स्वत:, पत्नी व दोन्ही मुलींकडे मिळून एकूण जंगम मालमत्ता – 5,26,76,788.25 रुपये.
मुळशीत मुठा, भूगाव व दासवे या गावांमध्ये आणि वाई तालुक्यात शेतजमीन एकूण अदमासे चालू बाजारमूल्य (2024 मधील शपथपत्रानुसार) – 19,74,646 रुपये.
मंत्री मोहोळ व त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण स्थावर मालमत्तेचे (शेतजमीन, वाणिज्यिक इमारती, निवासी इमारती) चालू बाजारमूल्य (2024 च्या शपथपत्रानुसार) – 19,05,67,695 रुपये.