Ganesh Sonawane
पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी आर्मीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. परंतु यंदाची दिवाळी पीएम मोदींनी गोव्यात नौसैनिकांसोबत (Navy) साजरी केली.
गोव्याच्या नेवल बेसवरुन नौदलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
तुमच्यासोबत दिवाळी साजरी करणं माझं सौभाग्य असल्याचं मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, माझ्या एकाबाजूला समुद्र आणि दुसऱ्याबाजूला माझ्या वीर सैनिकांच सामर्थ्य आहे.
समुद्राच्या पाण्यावरील ही सूर्य किरणांची चमक म्हणजे वीर जवानांसाठी दीवाळीचे दिवे आहेत असही मोदी म्हणाले.
INS विक्रांतवरुन वीर नौसैनिकांशी संवाद साधताना पीएम मोदी यांनी पाकिस्तानला कठोर संदेश सुद्धा दिला.
INS विक्रांतवरुन त्यांनी देशवासियांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
विक्रांत या नुसत्या नावानेच पाकिस्तानची झोप उडाली. ज्याचं नाव शत्रुच्या साहसाचा शेवट करेल ते म्हणजे INS विक्रांत असं मोदी म्हणाले.