सरकारनामा ब्यूरो
हालाकिची परिस्थिती असतानाही कष्ट करुन UPSC सारखी कठीन परीक्षा पास करत IAS झालेले देशातील मुस्लिम अधिकारी कोण आहेत पाहू...
देशात असे अधिकारी आहेत जे गरिबीवर मात करत आहोरात्र कष्ट करुन IAS झाले आहेत यातीलच एक आहेत अतहर आमिर खान, अन्सार शेख...
अतहर आमिर खान हे जम्मू-काश्मीर येथील रहाणारे आहेत. 2015 मध्ये त्यांनी UPSC परीक्षा पास करुन दुसरा क्रमांक पटकावला आहे. अतहर यांची पोंस्टिग जम्मू काश्मीर येथील कुलगाम जिल्ह्यात करण्यात आली आहे
अन्सार शेख यांचे वडिल ऑटोरिक्षा चालक होते. अन्सार यांनी त्यांच्या वडिलाचं स्वप्न पूर्ण केल. 2016 मध्ये UPSCपरीक्षा उत्तीर्ण करत 361वा रँक मिळवला. अवघ्या 21 व्या वर्षी IAS झाले.
2010 मध्ये शाह फैसल यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. पहिला क्रमांक मिळवत ते IAS झाले. शाह फैसल सध्या सांस्कृतिक मंत्रालयामध्ये उपसचिव म्हणून कार्यरत आहेत.
जुनैद अहमद हे उत्तर प्रदेशामधील राहणारे आहेत. जुनैद यांनी 2018 मध्ये UPSC त तिसरा क्रमांक मिळवला. जुनैद यांचं पोस्टिंग सध्या झांसी येथे करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे राहणारे मोईन अहमद यांचे वडील बस चालक होते. अत्यंत कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी 2022 मध्ये UPSCची परीक्षा उत्तीर्ण केली आणि 296 वा रँक मिळवला.
फराह हुसैन यांचा जन्म राजस्थान येथील झंझुनू जिल्हात झाला आहे. फराह यांनी 2016 मध्ये 'यूपीएससी'ची पहिल्यांदा परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांना अपयश आलं. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि त्या फक्त पास न करता ऑल इंडिया रँक 267वा मिळवला. त्यांचं पोस्टिंग सध्या जोधपूर आहे.
गुडगाव येथील रुहानी यांनी एकदा, दोनदा नाही तर चार वेळा UPSC परीक्षा दिली. पण त्यांना चारही वेळा अपयश आले. हार न मानता त्यांनी परीक्षेची तयारी सुरु ठेवली आणि पाचव्या प्रयत्नात त्यांनी 5 क्रमांक मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली.