Akshay Sabale
पंतप्रधानांनी मागितलेल्या माफीमध्ये मग्रुरी होती, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ते 'गेट वे ऑफ इंडिया' येथे बोलत होते.
महाराष्ट्रातील वातावरणाला राजकारण म्हणायला तयार नाही. तर ते गजकरण आहे. त्यांना खाजवत बसू देत. या चुकीला माफी नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
'गेट वे ऑफ इंडिया', म्हणजेच देशाचे प्रवेशद्वार, तेथून शिवद्रोही सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया, गेट आऊट, म्हणायला आम्ही येथे जमलो आहोत, असं ठाकरेंनी म्हटलं.
पंतप्रधानांनी माफी मागितली. माफी मागितली नसती, तर राज्याने, महाराष्ट्राने तुम्हाला शिल्लक ठेवले असते काय? असा उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
माफी मागताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. ती तुम्हाला पसंत आहे का? माफी नुसत्या शब्दांनी नसते, मग्रुरीनं माफी मान्य नाही, असा घाणाघात ठाकरेंनी केला.
महाराजांचा पुतळा पडला म्हणून मोदींनी मागितली की, पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.