MVA : महाविकास आघाडीच्या पत्रात काय? सरकारची होणार कोंडी!

Roshan More

मविआचे

महाविकास आघाडीने सरकारला पत्र लिहून तब्बल 13 मुद्दे मांडत सरकारीच कोंडी करत चहापानावर बहिष्काराची कारणे सांगितले.

MVA | sarkarnama

पाणी नियोजन चुकले

पहिल्या मुद्दा हा दुष्काळाचा असून त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यात पाऊस लांबल्यामुळे दुष्काळाची परिस्थीती निर्माण झाली असून शासनाचे पाण्याचे नियोजन चुकलेले आहे.

MVA | sarkarnama

फसवी शेतकरी कर्ज माफी

दुसऱ्या मुद्द्यात शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याच्या म्हटले आहे. मदतीचा हात देण्याऐवजी सरकारने अटींची भिंत उभी केली आहे. शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळा आण ७/१२ कोरा करा, अशी मागणी केली आहे.

कांद्याला भाव मिळत नाही...

कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करून नाफेडमार्फत मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे, असे सांगत तिसऱ्या मुद्दात कांदा प्रश्न मांडला आहे.

ढासळलेली कायदा व सुव्यवस्था

राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार, दररोज २७ चिमुकल्यांवर बलात्कार होतात. म्हाडा भूखंड घोटाळा महिला अत्याचार प्रकरण हे प्रशासनातील भ्रष्टाचार, राजकीय संरक्षण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अपयशाचे गंभीर संकेत आहे, असे चौथ्या मुद्यात म्हटले आहे

इंधन महागले

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याचा फटका राज्याला बसला आहे. लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले जात आहे. ८१ लाख अपात्र लाभार्थी ठरले आहेत.

विरोधी पक्षनेतेपद

विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती केली जात नाही. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेऊन संविधान आणि लोकशाहीचा अवमान केला जात आहे, असे पत्रात म्हटले आहे.

NEXT : विधान परिषदेसाठी मतांचा कोटा कसा निश्चित केला जातो? समजून घ्या एका क्लीकवर

Election Commission Guidelines Over Maharashtra Legislative Council Election | Sarkarnama
येथे क्लिक करा