Pradeep Pendhare
बुकर पुरस्कार विजेत्या कन्नड लेखिका बानू मुश्ताक जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा उद्घाटन करतील, अशी घोषणा CM सिद्धरामय्या यांनी केली.
लेखिका बानू मुश्ताक यांच्या ‘हृदय दीप’ या ग्रंथाला बुकर पुरस्कार 2025 मिळाला आहे.
कर्नाटकातील पहिल्या महिलेला लेखिकाला बुकर पुरस्कार मिळाला असून, बानू मुश्ताक यांनी शेतकरी आणि कन्नड चळवळींमध्ये काम केलं आहे.
म्हैसूर दसरा 22 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत 11 दिवसांसाठी असून, जिल्हा प्रशासनानं अधिकृतपणे बानू मुश्ताक यांना आमंत्रित करणार आहेत.
दसरा कार्यक्रमात ‘एअर शो’साठी परवानगी देण्यात आली असून, बानू मुश्ताक यांच्याबरोबर भाजपचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना देखील आमंत्रितही करण्यात आलं आहे.
बानू मुश्ताक यांचे सहा लघुकथा संग्रह, एक कादंबरी, एक निबंध संग्रह आणि एक कविता संग्रह प्रकाशित असून उर्दू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि इंग्रजीमध्ये अनुवादित झाले आहेत.
बानू मुश्ताक यांचा जन्म 3 एप्रिल 1948 रोजी हसन इथं झालेला आहे. लेखिका असण्यासोबतच एक कार्यकर्त्या, पत्रकार, वकील आणि राजकारणी देखील आहेत. बी.एस्सी आणि एलएलबी पदवी आहे.
1981 ते 1990 दरम्यान,कवी आणि लेखक पी. लंकेश (मारलेल्या कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांचे वडील) यांनी संपादित केलेल्या लंकेश पत्रिके या टॅब्लॉइडमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले.
1983 मध्ये, त्या हसननगर शहर परिषदेच्या सदस्या म्हणून निवडून आल्या असून, त्यांनी दोन टर्म सेवा बजावली.
बानू मुश्ताक यांना लिखाणावर विरोध झाला. चाकूधारी हल्लेखोरानं जीवघेणा हल्ला केला. तरीही मुस्लिम कुटुंबांबद्दल लिहिण्यासाठी बानू शब्दांचा वापर सुरूच ठेवला.