कुंभमेळ्याची परंपरा नेमकी किती जुनी आहे? चीनी प्रवासी अन् पाच लाख लोकांच्या उपस्थितीचा ऐतिहासिक दाखला!

Ganesh Sonawane

कुंभपर्वाचा नेमका उगम कधी?

कुंभपर्वाची सुरुवात नेमकी कोणत्या काळात झाली, याचे ठोस उत्तर आजही उपलब्ध नाही. या उत्सवाचे नेमके वय सांगणे इतिहासकारांसाठीही आव्हानात्मक आहे.

Kumbh Mela History, Hiuen Tsang | Sarkarnama

इतिहासात सापडतो १५०० वर्षांपूर्वीचा संदर्भ

कुंभपर्वाच्या प्राचीनतेचा मागोवा घेताना सातव्या शतकातील ऐतिहासिक नोंदी महत्त्वाच्या ठरतात. त्यातून या परंपरेच्या जुन्या स्वरूपाची माहिती मिळते.

Kumbh Mela History, Hiuen Tsang | Sarkarnama

चीनी प्रवासी ह्यूएन त्संगचा महत्त्वाचा उल्लेख

सातव्या शतकात भारतभेटीवर आलेल्या चीनी प्रवासी ह्यूएन त्संगने आपल्या प्रवासवर्णनात एका भव्य धार्मिक उत्सवाची नोंद केली आहे.

Kumbh Mela History, Hiuen Tsang | Sarkarnama

प्रयागच्या संगमावर जमले पाच लाख लोक!

ह्यूएन त्संगने प्रयाग येथील संगमावर आयोजित झालेल्या उत्सवाचे वर्णन केले आहे. या सोहळ्यासाठी तब्बल पाच लाख लोक जमल्याचा उल्लेख आढळतो.

Kumbh Mela History, Hiuen Tsang | Sarkarnama

तब्बल ७५ दिवस चालला होता उत्सव

हा धार्मिक उत्सव एक-दोन दिवसांचा नव्हता, तर तब्बल ७५ दिवस चालला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग हे त्याचे वैशिष्ट्य होते.

Kumbh Mela History, Hiuen Tsang | Sarkarnama

इ.स. ६४४ मधील ऐतिहासिक नोंद

ह्यूएन त्संगने वर्णन केलेल्या या उत्सवाचा काळ इ.स. ६४४ असा सांगितला जातो. त्यामुळे कुंभपर्वाच्या प्राचीन परंपरेचा अभ्यास करताना हा संदर्भ महत्त्वाचा ठरतो.

Kumbh Mela History, Hiuen Tsang | Sarkarnama

किमान १५०० वर्षांची परंपरा?

या ऐतिहासिक नोंदीवरून भारतात भव्य धार्मिक मेळाव्यांची परंपरा किमान १५०० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे दिसते.

Kumbh Mela in India | Sarkarnama

नाशिकमध्ये पुन्हा सजणार कुंभपर्व!

या प्राचीन धार्मिक परंपरेचा वारसा पुढे नेत नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये २०२६-२७ पासून कुंभपर्वाचे आयोजन होत आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गोदावरीच्या तीरावर पुन्हा एकदा श्रद्धेचा महासोहळा रंगणार आहे.

Kumbh Mela History, | Sarkarnama

NEXT : नाशिकसह 'या' चार शहरांतच का भरतो कुंभमेळा? जाणून घ्या समुद्रमंथनाची पौराणिक कथा

येथे क्लिक करा