सरकारनामा ब्यूरो
1961 मध्ये नागालँडमध्ये 'ट्रान्सिशनल प्रोव्हिजन रेग्युलेशन' नावाचा कायदा लागू करण्यात आला 45 लोकांचा एक गट त्याच्या जमाती परंपरा आणि संस्कृतीनुसार निवडला जाणार होता.
1962 राज्य कायदा संसदेने मंजूर केल्यानंतर नागालँड राज्य अस्तित्वात आले. पण 30 नोव्हेंबर 1963 ला येथील हंगामी सरकार विसर्जित करण्यात आले.
1 डिसंबर 1963 मध्ये नागालँडला राज्याचा दर्जा मिळाला. हाच दिवस नागालँड स्थापना दिवस म्हणून साजरी केला जातो.
नागालँडला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी तेथील लोंकानी दिलेला लढा हा त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना कळावा यासाठी हा दिवस साजरा करतात.
नागालँडच्या स्थापना दिवसानंतरचं येथे हॉर्नबिल या महोत्सवाला सुरुवात होते.
पश्चिमेला आसाम, पूर्वेला म्यानमार बर्मा, उत्तरेला अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि दक्षिणेला आसामच्या काही भागांशी नागालँडची सीमा जोडली आहे.
नागालँड हे भारताचं 16 वं राज्य असून यांची राजधानी कोहिमा ही आहे. नागालँमध्ये एकूण 16 प्रशासक जिल्हे आहेत.
नागालँडमध्ये अंगामी, एओ, चाखेसांग, चांग, दिमासा कचारी, खियामनियुंगन संगतम यांसह जवळपास 17 जाती आहेत.
एकूण 16 भाषा बोलल्या जातात. चीन तिबाती ही तेथील प्रामुख्याने बोलली जाणारी भाषा आहे.
नागालँडला 'पूर्वेचे स्वित्झर्लंड' असेही म्हणतात.