Sunil Balasaheb Dhumal
भूमिका स्पष्ट नसतानाही नवाब मलिक सत्ताधारी अजित पवार गटासोबत विधिमंडळात बसले. यावरून विरोधकांनी भाजपला धारेवर धरले.
यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी देशाला महत्त्व देत मलिकांना महायुतीत स्थान नसल्याचे पत्रच अजित पवारांना पाठवले.
भाजपला अंडरवर्ल्ड दाऊदचा सहकारी इक्बाल मिर्चीशी संबंध असलेले प्रफुल पटेल कसे चालतात, असा कळीचा प्रश्न उपस्थित केला.
प्रफुल पटेल यांनी दाऊदचा सहकारी इक्बाल मिर्चीसोबत करार करून वरळी येथील सीजे हाऊसमधील मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला.
या प्रकरणात प्रफुल पटेल यांचे वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले सील केले आहेत.
सीजे हाऊसमधील इक्बाल मिर्ची कुटुंबातील सदस्यांचे दोन मजलेही ईडीने सील केलेले आहेत.
मनी लाँड्रिंगप्रकरणी 2019 मध्ये पटेलांची चौकशी केली आहे, तर 2022मध्ये ईडीने या आरोपात गँगस्टर इक्बाल मिर्चीसोबत खरेदी केलेले मालमत्ता प्रकरणही जोडले.
प्रफुल पटेल यांनी वारंवार हे आरोप फेटाळले आहेत. याला शरद पवारांनी उत्तर दिले असून, तीच माझी भूमिका असल्याचे पटेलांनी आता स्पष्ट केले आहे.