सरकारनामा ब्यूरो
'ट्रॉली बस' ही नितीन गडकरी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सार्वजनिक वाहतूक अत्याधुनिक, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बनवणे हा उद्देश आहे
सुरुवातीला नागपूर शहराच्या रिंग रोडवर आर्टिक्युलेटेड इलेक्ट्रिक ( ट्रॅाली) बससेवा सुरू करण्याचा प्रकल्प मंजुरीच्या दारात आहे.
ट्रॉली बस या विद्युत बस असून त्या ओव्हरहेड वीजतारा वापरून धावतात. विशेष म्हणजे, आवश्यकता भासल्यास त्या बॅटरीवरही चालू शकतात.
केवळ 60 सेकंदात 40 किलोमीटर प्रवासासाठी बस चार्ज होणार, तसेच इतर बस सवेच्या तुलनेत 30 टक्के कमी भाडे लागणार आहे.
140 प्रवाशांची आसन क्षमता, वातानुकूलित सुविधा, CCTV, सीटवर चार्जिंग पोर्ट, तसेच पॅकेटबंद जेवण उपलब्ध असणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत शहरात 30 आर्टिक्युलेटेड इलेक्ट्रिक बस धावणार, दररोज 42 किलोमीटरचा प्रवास करतील. 65 महत्वाच्या स्टॅापवर थांबणार.
विमानांप्रमाणेच या बसमध्येही बस हाॅस्टेस असतील, ज्या प्रवाशांना विविध सेवा पुरवतील, अस बोललं जात आहे.
या प्रकल्पाचे मुख्य ध्येय म्हणजे प्रवाशांना मेट्रोच्या तुलनेत कमी खर्चात आणि सोयीस्कर असा प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणे असा आहे.