सरकारनामा ब्यूरो
IAS विवेक जॉन्सन हे महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
जॉन्सन यांनी नागपूरच्या खुल्या विज्ञान उद्यानांना भेट दिली आणि तेथून ते अत्यंत प्रेरित झाले.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या आवडीबरोबर खेळण्याचीही आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी चंद्रपूरमध्ये अनोखा उपक्रम राबवला.
उपक्रमांतर्गत त्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 28 ओपन सायन्स पार्क उभारण्यात आले.
6,500 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेले हे ‘ओपन सायन्स पार्क’ चंद्रपूर शहरातील चर्चेचा विषय बनले आहे.
शिवाय मुलांची खेळातील क्षमता जाणून घेण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली 75 क्रीडा संकुलेही उभारण्यात आली आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी त्यांना ‘आयएएस प्रॉमिसिंग’ श्रेणीतील ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विवेक जॉन्सन यांचे देशभर कौतुकही केले जात आहे.