Pradeep Pendhare
विजयादशमीच्या दिवशी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थान झाली होती.
नागपूर इथल्या रेशीम बाग मैदानावर 'RSS'चा ऐतिहासिक शताब्दी वर्षाबरोबर विजयादशमीची जोरदार तयारी सुरू आहे.
विजयादशमीला संघ परिवारातील विविध संस्थांच्या प्रमुखांसह तब्बल 15 हजार गणवेशधारी स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत.
रेशीम बाग मैदानात सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांच्या हस्ते सुरूवातीला शस्त्रपूजन होईल.
सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत काय भाषण करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
संघ परिवारानं या ऐतिहासिक कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे.
संघाकडून देशभरात विविध शाखांमध्ये पथसंचलनालयाचे आयोजन करून शताब्दी वर्ष साजरे करण्याचे आवाहन केलं आहे.
देशभरात एक लाखाहून अधिक 'हिंदू संमेलन' आणि 'घर घर संपर्क' अभियानाची संघ परिवारानं घोषणा केली आहे.
घाना, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, थायलंड, इंग्लंड आणि अमेरिका इथल्या नागरिकांना देखील आमंत्रण.