Dr Priyal Chauragade: वाघिणीसमोर 'ती' शिकार होऊन बसली...'; 'डॅशिंग' लेडी डॉक्टरकडून 4 महिन्यांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारी मोहीम फत्ते

Deepak Kulkarni

वाघिणीचा धुमाकूळ

नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी येथे नरभक्षक वाघाला जेरबंद केल्यानंतर उमरेड वनपरिक्षेत्रातही गेल्या काही महिन्यांपासून एका वाघिणीनं प्रचंड धुमाकूळ घातला होता.

Nagpur Dashing Dr.Priyal Chauragade | Sarkarnama

दोन जणांचा मृत्यू...

खळबळजनक बाब म्हणजे या वाघिणीच्या हल्ल्यात निर्मला गभणे आणि दिगंबर पाटील यांना जीव गमवावा लागला होता. यानंतरही तिनं अनेकांवर हल्ला करत त्यांना जखमी केलं होतं.

Nagpur Dashing Dr.Priyal Chauragade | Sarkarnama

गावकऱ्यांचं आंदोलन

या वाघिणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण होतं.तसेच तिला जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी आंदोलन उभारलं होतं

Nagpur Dashing Dr.Priyal Chauragade | Sarkarnama

प्रधान मुख्य वनसंरक्षकाची परवानगी

नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) एम.एस. रेड्डी यांनी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर घडामोडींना वेग आला.

Nagpur Dashing Dr.Priyal Chauragade | Sarkarnama

बदलावा लागला प्लॅन

नागपूर वनविभागाला गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित वाघिणीनं हुलकावणी दिली होती. तिला जेरबंद करण्यासाठी बचाव पथकाला सातत्यानं आपला प्लॅन बदलावा लागला.

Nagpur Dashing Dr.Priyal Chauragade | Sarkarnama

कॅमेरा ट्रॅप

या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आला होता. तसेच दोन ठिकाणी शिकारही ठेवण्यात आली होते. मात्र, वाघिणीनं इतर जनावरांची शिकार केल्यामुळे वनविभाग व गावकऱ्यांचं टेन्शन वाढलं होतं.

Nagpur Dashing Dr.Priyal Chauragade | Sarkarnama

धाडसी निर्णय

यानंतर वनविभागाकडे मचाण उभारण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यानं अन् वाघीण हुलकावणी देण्याची शक्यता लक्षात घेऊन पथकानं धाडसी निर्णय घेतला.

Nagpur Dashing Dr.Priyal Chauragade | Sarkarnama

स्वतः पिंजऱ्यात

या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी अखेर महिला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल चौरागडे आणि त्यांचे सहकारी प्रतीक घाटे स्वतः पिंजऱ्यात जाऊन बसल्या.

Nagpur Dashing Dr.Priyal Chauragade | Sarkarnama

यानंतर तब्बल 15 तासांच्या प्रतीक्षेनंतर वाघीण पिंजऱ्याजवळ आली. यानंतर योग्य संधी साधत डॉ. चौरागडे यांनी अचूक निशाणा साधला. अवघ्या 15 मिनिटांत वाघीण बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला नागपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आलं. अशाचप्रकारे पारशिवणी येथेही जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात चौरागडे यांना यश आलं होतं.

Nagpur Dashing Dr.Priyal Chauragade | Sarkarnama

NEXT: UPSC क्रॅक करूनही IAS अधिकारी ट्रेनिंगमध्ये फेल; आता नोकरी राहणार की जाणार? काय सांगतो नियम?

UPSC-.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...