Rashmi Mane
UPSC सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे ही मोठी गोष्ट असली तरी त्यानंतरचा प्रवास तितकाच आव्हानात्मक असतो. निवड झालेल्या उमेदवारांना मसुरी येथील LBSNAA अकादमीत कठोर प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.
या प्रशिक्षणातील परीक्षा आणि मूल्यांकन यशस्वीपणे पार केल्यानंतरच अधिकारी पूर्णपणे सेवेत रुजू होतात.
दरवर्षी सुमारे 5 ते 6 लाख उमेदवार UPSC परीक्षा देतात. मात्र त्यापैकी केवळ 182 ते 184 जणांची IAS साठी निवड होते. निवडीनंतर दोन वर्षांचे अनिवार्य प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते.
प्रोबेशनर्सना मिळालेल्या राज्याच्या स्थानिक भाषेची परीक्षा अनेकांसाठी कठीण ठरते. वेगळ्या राज्याचा कॅडर मिळाल्यास त्या भाषेचे ज्ञान मिळवणे आणि परीक्षा उत्तीर्ण होणे हे मोठे आव्हान बनते.
प्रशिक्षणादरम्यान एखाद्या विषयात अपयश आले तरी लगेच नोकरी धोक्यात येत नाही. अधिकाऱ्यांना पुनर्परीक्षेची संधी दिली जाते. बहुतेक उमेदवार री-एग्झाममध्ये यश मिळवून पुढील टप्प्यात प्रवेश करतात.
LBSNAA मध्ये कायदा, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, व्यवस्थापन आणि वर्तनशास्त्र यांसारख्या विषयांच्या परीक्षा घेतल्या जातात. प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक असते.
प्रशिक्षणातील परीक्षा पास करण्यासाठी प्रयत्नांची कोणतीही मर्यादा नाही. मात्र सेवेत रुजू झाल्यानंतर चार वर्षांच्या आत सर्व आवश्यक परीक्षा उत्तीर्ण करणे अपेक्षित असते. केवळ परीक्षेत नापास झाल्यामुळे कोणालाही सेवेतून काढण्यात आलेले नाही.
प्रोबेशनर्सवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. कमी उपस्थिती, PT सत्रांना गैरहजेरी, वर्गात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आणि इतर नियमभंग यामुळे ही कारवाई होते. भावी अधिकाऱ्यांमध्ये शिस्त आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी हे नियम कठोरपणे लागू केले जातात.