Nagpur Vidhan Bhavan Photos : बघा, आतून कसे दिसते नागपूरचे विधानभवन; जाणून घ्या या वास्तूचा इतिहास...

Rashmi Mane

हिवाळी अधिवेशन

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे.

Sarkarnama

या वास्तूमध्ये दोन्ही सभागृहांचा समाविष्ट

या अधिवेशनात राज्याचे दोन्ही सभागृह, विधानसभा आणि विधान परिषद समाविष्ट आहेत.

Sarkarnama

वास्तूचा इतिहास

नागपूर येथील विधानभवन देखील प्रचंड भव्य आणि सुंदर आहे, जाणून घ्या या वास्तूचा इतिहास.

Sarkarnama

'कॉन्सिल हॉल'

सोनेरी सॅन्ड स्टोन, लाल रंगाच्या बिटा आणि चुन्याच्या वापरातून निर्माण झालेली विधानभवनाची डोलदार दुमजली जुनी इमारत पूर्वी 'कॉन्सिल हॉल' म्हणून ओळखली जात होती.

Sarkarnama

बांधकामाचा शुभारंभ

या वास्तूचा बांधकामाचा शुभारंभ चार्लेस बॅरॉन हार्डिंग्ज ऑफ पेन्सहर्स्ट, व्हाईसराय अँन्ड गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया यांच्या शुभहस्ते मंगळवार, दिनांक 17 डिसेंबर, 1912 रोजी झाला.

Sarkarnama

डिझाइन

इमारतीचे डिझाइन तेव्हाचे प्रसिद्ध वास्तुशिल्पकार - थॉमस मॉन्टेक्यू यांनी तयार केले होते. 

Sarkarnama

विधान भवन

सध्या विधान भवन ८.८६ एकर क्षेत्रावर वसलेले आहे.  

Sarkarnama

खर्च

विधान भवन ही इमारत १९१९ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आली व यासाठी त्यावेळी एकूण रुपये ५,४७,५०८ इतका खर्च आला.

Sarkarnama

Next : महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त चर्चासत्रात पत्रकारांचा गौरव ; पाहा खास फोटो! 

येथे क्लिक करा