Rashmi Mane
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरूवारपासून नागपुरात सुरू होत आहे, त्यानिमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ तीन आठवडे नागपुरात मुक्कामी असणार आहे
उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार आशिष जायस्वाल आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
अधिवेशनासाठी राज्यातील विविध पक्षांचे आमदार नागपुरात आले आहेत.
सध्या अधिवेशनात कोणते मुद्दे गाजतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
विधिमंडळ कामकाजाचे शतकोत्तरी वर्ष असल्याने विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे.
अधिवेशन तीन आठवडे चालणार असले तरी कामकाजाचे दिवस दहाच आहेत. पहिला आठवड्यात दोनच दिवस तर तिसऱ्या आठवड्यात तीन दिवस कामकाज आहे.फक्त एकच आठवडा पाच दिवस कामकाज आहे.