Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशन 'या' मुद्द्यांवर गाजणार! सत्ताधारी अन् विरोधक आमने- सामने येणार...

Rashmi Mane

आजपासून अधिवेशन

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरु होत आहे.

Sarkarnama

अनेक मुद्दे गाजणार

पुढील दोन आठवडे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. अधिवेशन अनेक मुद्द्यांवर गाजण्याची शक्यता आहे.

Sarkarnama

अधिवेशन गाजणार

सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यावर आमनेसामने येण्याची शक्यता आहे. 

Sarkarnama

समृद्धी महामार्गावर होणारे अपघात

समृद्धी महामार्गावरील अपघाताची मलिका ही सुरूच आहे. मात्र उपाय योजना होताना दिसत नसल्याने समृद्धी महामार्गावरील अपघाताचा विषय हा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

Sarkarnama

कंत्राटी नोकर भरती

कंत्राटी नोकर भरती निर्णयाचा प्रश्न उपस्थित करत विरोधक सरकारला कोंडीत पकडतील.

Sarkarnama

ललीत पाटील ड्रग्ज प्रकरण

ललीत पाटील ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा आणि रुग्णालयातील अधिक्षकांचा सहभाग समोर आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. यावरून विरोधक सभागृहात सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.

Sarkarnama

दुष्काळी परिस्थिती

राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक जिल्ह्यात दुष्काळ जन्य परिस्थिती उद्भवली आहे. यावरुनही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Sarkarnama

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

महिलावरील वाढत्या अत्याचारामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतं आहे. एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले. बालकांचे लैंगिक शोषण यावरून विरोधक आक्रमक भूमिका मांडतील.

Sarkarnama

 Next : हिवाळी अधिवेशनासाठी सत्ताधारी सज्ज, ट्रिपल इंजिन सरकारकडून ‘चहापाना’चा कार्यक्रम

येथे क्लिक करा