सरकारनामा ब्यूरो
प्रियांका गांधी संसदेत घेऊन येत असलेल्या बॅगाांची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. काय वेगळं आहे या बॅगांविषयी जाणून घेऊयात.
आज प्रियांका गांधी बांग्लादेशमधील हिंदूंच्या पाठिशी उभं राहा, असं लिहिलेली बॅग घेऊन संसदेत आल्या होत्या.
काल त्यांनी 'पॅलेस्टाईन' लिहिलेले बॅग घेऊन आल्या होत्या. पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी त्यांची आपुलकी व्यक्त करण्यासाठी त्यांनी ही बॅग आणली अस त्या म्हणाल्या.
पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या नेत्यांनी तसेच काँग्रेसच्या खासदारांनी प्रियांका गांधींचे कौतुक केले.
याचं उत्तर म्हणून त्यांनी बांग्लादेशच्या हिंदूंच्या समर्थनार्थ, बांग्लादेशमधील हिंदूंच्या पाठिशी उभं राहा, असं लिहिलेली बॅग घेऊन संसदेत आल्या. या बॅगची जोरदार जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.
संसद भवनातील ‘मकर गेट’ च्या येथे काँग्रेसच्या अनेक खासदार उपस्थित राहून ‘बांगलादेशच्या हिंदूंना समर्थन द्या’ असे लिहिलेले पोस्टर हातात घेत घोषणा दिल्या.
बांगलादेश सरकारशी चर्चा करून हिंदू आणि ख्रिश्चनांनवर होणाऱ्या अत्याचारांवर सरकारकडून लवकरात कारवाई करण्याची मागणी काँग्रेस खासदारांकडून यावेळी करण्यात आली.
भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी प्रियांका गांधींवर टीकास्र सोडत म्हणाले, या बॅगेवर पॅलेस्टाईन लिहिलेले आहे. पण यांचा भारताशी काहीही संबंध नाही.