Rashmi Mane
आज जगभरातून विद्यार्थी अभ्यासासाठी ब्रिटन आणि अमेरिकेत शिकायला जातात, पण एक काळ असा होता, जेव्हा जगभरातून विद्यार्थी ज्ञान मिळवण्यासाठी भारतात येयचे.
नालंदा विद्यापीठात एकेकाळी 90 लाख पुस्तके होती आणि जगभरातून सुमारे 10 हजार विद्यार्थी नालंदा येथे शिक्षण घेण्यासाठी येत होती,
आज नालंदा विद्यापीठ पुन्हा चर्चेत आले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले.
455 एकरमध्ये पसरलेल्या नवीन कॅम्पस अतिशय भव्यदिव्य आहे.
प्रसिद्ध वास्तुविशारद बी.बी.जोशी यांनी नालंदा विद्यापीठाची रचना केली आहे.
2014 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या ऐतिहासिक विद्यापीठाच्या उभारणीचे भूमीपूजन केले होते.
नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिले निवासी विद्यापीठ मानले जाते. याची स्थापना पाचव्या शतकात गुप्त वंशातील सम्राट कुमार गुप्ता यांनी केली होती.
या विद्यापीठाची पूर्णबांधणी करण्याचा पुढाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता.
तुर्को-अफगाण लष्करी जनरल खिलजी यांनी केलेल्या आक्रमणकर्त्यांच्या टोळीने 1190 च्या दशकात विद्यापीठ नष्ट केले होते.