Pradeep Pendhare
एक नाही, तब्बल चारवेळा UPSC परीक्षा दिल्यानंतर उमा हराथी IAS परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील रहिवासी असून, उमा यांचे शिक्षणही तिथेच झाले आहे.
उमा यांचे वडील एन. व्यंकटेश्वरलू पोलिस अधीक्षक आहेत. उमानं IAS स्वप्नांना वडिलांनी बळ दिले.
जेव्हा जेव्हा वडिलांना पोलिसाच्या गणवेशात पाहायची, तेव्हा उभा अधिक प्रभावित व्हायची.
UPSC परीक्षेत तब्बल चार वेळा अपयशाचा सामना केला. पण जिद्दीने अभ्यास करत 2022 मध्ये देशात तिसरी रँक मिळवली.
उमा यांनी IIT हैदराबाद येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech) पदवी घेतली आहे.
फादर्स डेच्या पूर्वसंध्येला, राज्य पोलीस अकादमीत SP एन. व्यंकटेश्वरलू यांनी IAS झालेल्या मुलीला सॅल्यूट मारत अभिवादन केले. व्यंकटेश्वरलू यांनी मला अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.
IAS मुलीला SP वडिलांनी सॅल्यूट मारल्याचे आणि स्वागताचा पुष्पगुच्छ दिल्याचा फोटो आणि व्हिडिओ त्यावेळी समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. या क्षणाचे अनेकांनी कौतुक केलं.
"नापास होणे ठीक आहे. मी अनेकदा नापास झालो आहे. पण स्वत:चा अभिमान बाळगा," असे उमा यांनी UPSC अभ्यास करणाऱ्यांना मंत्र दिला.