Name in Voter list : तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, कसं शोधाल? जाणून घ्या, सोप्या पद्धतीनं...

Rashmi Mane

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

Name in Voter list | Sarkarnama

मतदान करण्यासाठी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही हे तपासून घेणे गरजेचे आहे.

Name in Voter list | Sarkarnama

मतदानाच्या दिवशी मतदार यादीत नावाबाबत संभ्रम किंवा नाव नसल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये असल्याची खात्री आधीच करावी.

Name in Voter list | Sarkarnama

मतदान करण्यासाठी मतदार यादीत आणि मतदान केंद्राबाबत सर्व नागरिकांना माहिती घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार नाही.

Name in Voter list | Sarkarnama

यादीत नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी निवडणूक विभागाने वोटर हेल्पलाइन अ‍ॅप विकसित केले आहे. तसेच आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर करता येते. 

Name in Voter list | Sarkarnama

डाऊनलोड करा मतदार हेल्पलाइन

आपले नाव मतदार यादीत घरबसल्या आपल्याच मोबाइलमध्ये पाहायचे असल्यास वोटर हेल्पलाइन अ‍ॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून त्याचा उपयोग करता येतो.

Name in Voter list | Sarkarnama

तसेच मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर देखील करता येईल.

Name in Voter list | Sarkarnama

Next : घरात गुण्यागोविंदाने नांदणारे, निवडणुकीच्या रिंगणात बनले हाडवैरी

येथे क्लिक करा