Rashmi Mane
केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 थेट बँक खात्यात जमा करतं.
राज्य सरकारने देखील दरवर्षी 6000 शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं शेतकऱ्यांना मिळणार एकूण 12,000 रुपये.
फक्त पीएम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी शेतकरी या योजनेसाठी पात्र.
तेच बँक खाते नमो योजनेसाठीही लागू.
शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 4000 म्हणजे दरवर्षी एकूण 12,000 केंद्र व राज्य मिळत आहेत,
शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण, शेतीसाठी वेळेवर निधी उपलब्ध होणे.
कर्जावरील अवलंबित्व कमी करणे हे याेजने मागचा उद्देश आहे.
या योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. पीएम किसान योजनेतील माहिती आणि खाते यामध्येच वापरली जाणार.