सरकारनामा ब्यूरो
मुखेड तालुक्यात लेंडी नदीला आलेल्या महापुराने अनेक गावे कवेत घेतली असून प्रकल्पग्रस्ताचे हाल सुरू आहेत.
प्रकल्पाची कामे घाईने उरकल्याने व प्रवाह रोखला गेल्याने हे हाल झाले आहेत.सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९८२ मध्ये केले होते.
प्रकल्पाची किंमत दोन हजार १८४ कोटींवर गेली आहे. विविध कारणांनी तब्बल तीस ते पस्तीस वर्षे हा प्रकल्प रखडला.
बाधित कुटुंबाचे पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाच्या अंतिम टप्प्यातील घळभरणी व तळभरणी ही कामे करता येत नाहीत.
प्रशासनाने व सरकारने पोलिस बळाचा वापर करून ही कामे करून घेतली आहे. बारा गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे.
निकष डावलून कामे केल्याने लेंडी नदीचा मुख्य प्रवाहच बंद झाला, परिणामी गावांत पाणी शिरले व नागरिकांचे मृत्यू झाले.
विद्यमान सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आज ही परिस्थिती ओढवल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.