Rajanand More
आर. श्रीलेखा या भाजपच्या केरळमधील नेत्या आहेत. सध्या त्या पक्षाच्या उपाध्यक्षा असून तिरूवनंतपुरम महापालिकेत नगरसेविका आहेत.
केरळच्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. मागीलवर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी पहिला विजय मिळवला आहे.
श्रीलेखा या केरळच्या पहिल्या महिला DGP म्हणून सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे केवळ तिरुवनंतपुरमच नव्हे तर संपूर्ण केरळमध्ये त्यांच्याविषयी आदर आहे.
निवृत्तीनंतर काही महिन्यांनी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत महापालिका निवडणुकीत तिकीट मिळवले. त्या महापौरपदाच्या प्रबळ दावेदार होत्या.
भाजपने महापालिकेत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर श्रीलेखा याच महापौर होतील, अशी शक्यता होती. पण त्यांची संधी हुकली. आपल्याला महापौर पदाचे आश्वासन दिले होते, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली होती.
भाजपने आता श्रीलेखा यांना थेट विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे. त्यांना वट्टीयूरकावू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
श्रीलेखा यांची एक डॅशिंग महिला पोलिस अधिकारी म्हणून ओळख होती. त्यांना २०१३ मध्ये राष्ट्रपती पोलिस पदकही मिळाले आहे.
पोलीस दलातील सेवेनंतर आता त्यांनी राजकारणातही आपला दबदबा निर्माण केले आहे. राजकारणात प्रवेश केल्यानंतर काही महिन्यांतच आधी नगरसेवकपद आणि आता थेट आमदारकीसाठी उमेदवारी मिळाली आहे.