Mangesh Mahale
साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या सारंगखेडा (जि. नंदूरबार) येथील घोडेबाजार देशात प्रसिद्ध आहे.
दरवर्षी सांरगखेडा येथे दत्तजंयतीनिमित्त यात्रा भरते, यात्रेत 'चेतक महोत्सव' देशभरात प्रसिद्ध आहे.
देशभरातील घोड्याचे शौकिन खरेदी-विक्रीसाठी येत असतात.
महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्यावरुन महोत्सवाला नाव देण्यात आले आहे.
यंदा अश्वपंढरी मारवाड़ी, काठियावाड़ी, नुकड़ा सिंधी आदी जातीची 3 हजार घोडे दाखल झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या घोड्यांच्या ऐतिहासिक नोंदी येथे आढळतात.
घोड्यांची किंमत 50 हजार रुपयांपासून ते 10 कोटी रुपयांपर्यंत आहे.
बाजाराच्या पहिल्याच दिवशी 11 लाख 11 हजार रुपयांचा एक घोडा विकला गेला.
पंधरा दिवस चालणाऱ्या या चेतक महोत्सवात घोड्याच्या विक्रीतून 20 ते 25 कोटींची उलाढाल होते.