Vijaykumar Dudhale
पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव ऊर्फ पी. व्ही. नरसिंहराव यांचा जन्म आंध्र प्रदेशातील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी 28 जून 1921 रोजी झाला.
नरसिंहराव यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठांतून झाले. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले होते.
पी. व्ही. नरसिंहराव यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला.
आंध्र प्रदेश विधानसभेत पी. व्ही. नरसिंहराव यांनी 1957 ते 1977 दरम्यान प्रतिनिधित्व केले. 1971 ते 73 या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 1977 पासून 1996 पर्यंत सातत्याने लोकसभेवर निवडून आले. लोकसभेच्या 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण, राव हे हनामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.
राजकारणातून निवृत्त होण्याच्या विचाराने त्यांनी 1991 ची निवडणूक लढवली नव्हती. मात्र, निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी नरसिंहराव यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली. पक्षाचे नेते म्हणूनही राव यांची निवड झाली आणि 21 जून 1991 रोजी त्यांनी पंतप्रधानपदी निवड झाली.
नरसिंहराव यांच्या कारकिर्दीतच अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात आली. त्याच दिवशी केंद्र सरकारने उत्तर प्रदेशमधील कल्याणसिंह यांचे भाजपचे सरकार बरखास्त केले. त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावली.
अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनाला जबाबदार धरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांवर बंदी घातली गेली. तसेच, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांतील भाजपची सरकारं बरखास्त करण्यात आली.
लोकसभेच्या 1998 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नरसिंहराव यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. त्यांचे 23 डिसेंबर 2004 रोजी निधन झाले.
किती वेळा देऊ शकता UPSC परीक्षा, कोणती पात्रता आहे आवश्यक?