Jagdish Patil
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे प्रमुख म्हणून 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
PM मोदी यांनी 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता.
त्यानंतर मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान म्हणून काम करत त्यांनी जनसेवेची 25 वर्षे पूर्ण केली आहेत.
या निमित्ताने त्यांनी दिल्लीतील सरोजिनी नगर येथील श्री विनायक मंदिरात पूजा केली.
मंदिरातील पूजेनंतर मोदी यांनी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवरून जनतेला संबोधित केलं.
यावेळी त्यांनी देशभरातील माझ्या कुटुंबीयांच्या सुख-समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी श्री गणरायाकडे प्रार्थना केल्याचं सांगितलं.
आज मी जे काही आहे त्यामागे देशाची जनता आहे, त्यांची दिवसरात्र सेवा करता यावी एवढी शक्ती मिळावी, असंही ते म्हणाले.
मोदींच्या जनसेवेची 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपने 'सेवा संकल्प यात्रा'अंतर्गत वडनगर ते वाराणसी अशी मोटारसायकल रॅली काढली आहे.