आपल्या आक्रमक भाषणांनी पुण्यातील MPSC चं आंदोलन गाजवणारा कोल्हापूरचा विवेकानंद पाटील...?

Deepak Kulkarni

विद्यार्थ्यांचं आंदोलन

पुण्यामध्ये एमपीएससीच्या अध्यक्षाच्या राजीनाम्यासाठी व इतर काही प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे.

Vivekanand Patil MPSC Student | Sarkarnama

आक्रमक भाषण

याच आंदोलनातून विवेकानंद पाटील नावाचा विद्यार्थी आपल्या आक्रमक आणि दणाणून सोडणाऱ्या भाषणांमुळे प्रचंड चर्चेत आला आहे.

Vivekanand Patil MPSC Student | Sarkarnama

विद्यार्थी अन् आंदोलनकर्ता

विवेकानंद पाटील हा कोल्हापूरचा माजगावचा राहणारा आहे.तो एक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आणि तसेच आता आंदोलनकर्ता म्हणून समोर आला आहे.

Vivekanand Patil MPSC Student | Sarkarnama

व्हिडिओ प्रचंड व्हायरल

विवेकानंदचे कोल्हापुरी आणि अस्खलित ग्रामीण शैलीतील तडाखेबंद भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानं त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Vivekanand Patil MPSC Student | Sarkarnama

सरकारवर हल्लाबोल

पाटील हा आपल्या भाषणातून एमपीएससीचा कारभार, परीक्षांमधील विलंब, पेपरफुटी आणि पारदर्शकता अशा एक ना अनेक मुद्द्यांवरुन सरकार व प्रशासनावर हल्लाबोल करताना दिसून येत आहे.

Vivekanand Patil MPSC Student | Sarkarnama

भिमनवार यांचा राजीनामा

विवेकानंदने एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा आणि आयोगाच्या कारभारात सुधारणा करण्याची मागणी उचलून धरली आहे.

Vivekanand Patil MPSC Student | Sarkarnama

कोल्हापूरहून पुण्याला...

तो एका सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी असून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी कोल्हापूरहून पुण्यात आला आहे.

Vivekanand Patil MPSC Student | Sarkarnama

आभाळ फाटल्याची जाणीव

पाटील याने या आंदोलनात बोलताना आमदार, खासदार आणि पक्ष फुटल्यावरही काही वाटले नाही, पण जेव्हा विद्यार्थ्यांचे पेपर फुटले, तेव्हा आभाळ फाटल्याची जाणीव झाल्याचं सांगितले. त्यांनी न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Vivekanand Patil MPSC Student | Sarkarnama

NEXT: जायंट किलर' महिला नेत्याची राज्यसभेत होणार एन्ट्री! भाजपची खेळी

Priyanka-Singh-Rawat.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...