Modi 3.0 Cabinet : एक, दोन नव्हे मोदींच्या मंत्रिमंडळात 'इतके' माजी मुख्यमंत्री

Akshay Sabale

मोदी 3.0 सरकारचा कार्यकाळ सुरू -

लोकसभा निवडणुकीत केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. यानंतर मोदी 3.0 सरकारचा कार्यकाळ सुरू झाला आहे.

narendra modi | sarkarnama

सहा माजी मुख्यमंत्री -

मोदी 3.0 सरकारमध्ये भाजपच्या सहा माजी मुख्यमंत्र्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदावर संधी देण्यात आली आहे. या मुख्यमंत्र्यांबद्दल जाणून घेणार आहोत...

narendra modi | sarkarnama

शिवराज सिंह चौहान -

शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे कृषी आणि ग्रामविकास खात्याचा कारभार देण्यात आला आहे.

shivraj singh chauhan | sarkarnama

राजनाथ सिंह -

राजनाथ सिंह हे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. सिंह यांच्याकडे पुन्हा एकदा संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

rajnath singh | sarkarnama

मनोहर लाल खट्टर -

मनोहर लाल खट्टर हे हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आहेत. खट्टर यांच्याकडे उर्जा आणि नगरविकास खातं देण्यात आलं आहे.

manohar lal khattar | sarkarnama

जीतनराम मांझी -

जीतनराम मांझी हे हिंदुस्थान आवाम मोर्चाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सुक्ष्म, लघू मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे.

jitan ram manjhi | sarkarnama

सर्बानंद सोनोवाल -

सर्बानंद सोनोवाल हे आसामचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांना बंदरे आणि जहाज मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे.

sarbananda sonowal | sarkarnama

एच. डी. कुमारस्वामी -

एच. डी. कुमारस्वामी हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र असून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे.

hd kumaraswamy | sarkarnama

NEXT : हिंदू राष्ट्राच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले भाजप आमदार टी. राजा सिंह कोण आहेत?

BJP MLA T Raja Singh | Sarkarnama