T Raja Singh : हिंदू राष्ट्राच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले भाजप आमदार टी. राजा सिंह कोण आहेत?

Jagdish Patil

भिवंडी धर्मसभा

भिवंडीतील धर्मसभेत बोलताना टी. राजा सिंह म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत भाजप चारसो पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं."

BJP MLA T Raja Singh | Sarkarnama

हिंदुत्ववादी मुख्यमंत्री

महाराष्ट्रात लव्ह जिहाद, गो हत्या ,धर्मांतर बंदी याबाबत कायदा का होत नाही? हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही. राज्याचे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणाची भीती आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

BJP MLA T Raja Singh | Sarkarnama

टी. राजा सिंह कोण आहेत?

त्यांच्या या भाषणामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तर सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे टी. राजा सिंह कोण आहेत जाणून घेऊ या.

BJP MLA T Raja Singh | Sarkarnama

भाजप आमदार

तेलंगणातील गोशामहल मतदारसंघातील ते भाजप आमदार आहेत. 2018 च्या निवडणुकीतही ते याच जागेवरून विजयी झाले होते.

BJP MLA T Raja Singh | Sarkarnama

वादग्रस्त विधानांमुळे निलंबित

ऑगस्ट 2022 मध्ये भाजपने टी. राजा सिंह यांना त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे निलंबित केले होते. निलंबन रद्द झाल्यानंतर पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवार केलं.

BJP MLA T Raja Singh | Sarkarnama

लोध कुटुंबात जन्म

त्यांचा जन्म 15 एप्रिल 1977 रोजी हैद्राबादच्या धुलपेट येथील लोध कुटुंबात झाला.

BJP MLA T Raja Singh | Sarkarnama

कॅसेट विकली

टी. राजा यांनी सुरुवातीला ऑडिओ आणि व्हिडिओ कॅसेट विकण्याचे दुकान चालवले. नंतर त्यांनी बंद इलेक्ट्रिक वायरिंगचा व्यवसाय सुरू केला.

BJP MLA T Raja Singh | Sarkarnama

तेलुगु देसम पक्षाचे सदस्य

सुरुवातीला ते तेलुगु देसम पक्षाचे सदस्य होते. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून ते आमदार झाले. 2014 आणि 2018 मध्येही त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली.

BJP MLA T Raja Singh | Sarkarnama

NEXT : छगन भुजबळांची धुलाई करणारे राज ठाकरेंचा शिलेदार संदीप देशपांडे...

Sandeep Deshpande | Sarkarnama