Jagdish Patil
पत्रकार परिषद एकनाथ शिंदे म्हणाले, मी नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण आम्ही नाराज होऊन रडणारे नव्हे तर लढणारे आहोत.
मी अडीच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. दिवस रात्र कॉमन मॅनचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केल्याचंही शिंदे म्हणाले.
मला भाजपने अडीच वर्षे पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता जो मुख्यमंत्री होईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी आणि ज्येष्ठ या सगळ्यांसाठी काहीतरी करावं ही माझी भावना होती.
गरीब परिवारातून आल्याने या सर्वांच्या वेदना मला समजत होत्या, त्यामुळे मी त्यांच्यासाठी काम केलं.
मुख्यमंत्रिपदाबाबत नरेंद्र मोदी आणिअमित शहा जो निर्णय घेतील त्याला माझा पाठिंबा असेल.
"सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न मोदी-शाह यांनी पूर्ण केलं. ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले."
तसंच यावेळी एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेत माझा कसलाही अडसर येणार नाही, असा शब्द भाजप श्रेष्ठींना दिला.
मला इतर सर्व पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ हीच ओळख पुरेशी आणि सर्वोच्च असल्याचंही ते यावेळी म्हणाले.