Sunil Balasaheb Dhumal
मुंबईला रायगडशी जोडणाऱ्या अटल सागरी सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
देशातील सर्वांत मोठा सागरी सेतू म्हणून सेतूबद्दल नरेंद्र मोदींनी गौरवोद्गार काढले.
शिवाजी महाराज, मुंब्रा देवी, सिद्धीविनायकाला प्रणाम करून मोदींनी सेतू मुंबईकरांसाठी खुला केला.
विकासाचे प्रतिबिंब असणाऱ्या या सेतूची बांधणी करणाऱ्या इंजिनिअर, कामगारांशी मोदींनी संवाद साधला.
कोरोनात काम सुरू ठेवल्याने सेतू वेळेत पूर्ण झाला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कामगारांचे आभार मानले.
संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कामगारांचे मनोबल वाढवले.
सेतूचे काम करणाऱ्या कामगारांसोबत सर्व नेत्यांनी काही वेळ चर्चा केली.
या सागरी सेतूमुळे मुंबई आणि रायगडचे अंतर कमी झाले.