Jagdish Patil
आर्थिक वर्ष 2026-27 च्या 'एप्रिल ते जून' या 3 महिन्यांचा भारताचा GDP 7.8 टक्के इतका नोंदवला गेला आहे.
हा दर RBI सह अनेक आघाडीच्या अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे.
त्यामुळे या यशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आनंद व्यक्त केला.
देशवासीयांचं अभिनंदन करत PM मोदींनी जागतिक संघर्षाच्या काळातही भारताने आपली प्रगती कायम ठेवल्याचं म्हटलं.
याच पार्श्वभूमीवर देशाचा विकास दर (GDP) म्हणजे नेमकं काय आणि तो कसा ठरवला जातो ते जाणून घेऊया.
ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजेच देशांतर्गत निर्माण झालेली सर्व उत्पादनं आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली चलनातील आकडेवारी होय.
GDP ची आकडेवारी दर 3 महिन्याला प्रदर्शित होते. देशांतर्गत झालेल्या उत्पादनांचा आणि सेवेचा जीडीपीचा दर ठरविण्यासाठी विचार केला जातो.
एखाद्या देशाचा GDP हा सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दाखवतो.
GDP चा दर दोन पद्धतीने निश्चित केला जातो. ज्यामध्ये वार्षिक आणि तिमाही पद्धतीचा समावेश आहे.
वार्षिक GDP मध्ये चालू वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादनाची मागील वर्षातील सकल उत्पादनाशी तुलना केली जाते.
तिमाही पद्धतीत मागील वर्षाचे कोणत्याही 3 महिन्यातील सकल देशांतर्गत उत्पादनाची तुलना चालू वर्षातील 3 महिन्यांच्या सकल उत्पादनाशी केली जाते.