Jagdish Patil
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका, असं आवाहन केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर सध्या भारतात किती सोनं आहे आणि जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेला देश कोणता ते जाणून घेऊया.
जगात सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेकडे असून या देशाकडे 8,133.50 टन सोने आहे.
अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी असून त्यांच्याकडे 3,351.5 टन सोन्याचा साठा आहे.
तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इटलीकडे 2,452 सोन्याचा साठा आहे. या देशाने अनेक दशकांपासून आपला साठा स्थिर ठेवला आहे.
इटलीनंतर फ्रान्सचा नंबर लागतो. या देशाकडे 2,437 टन सोनं आहे.
फ्रान्सनंतर चीनकडे 2,313 टन सोन्याचा साठा असून सोन्याची वेगाने खरेदी हा आशियाई देश आहे.
स्वित्झर्लंडमध्येही मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा आहे. सध्या या देशाकडे 1,040 सोनं आहे.
स्वित्झर्लंडनंतर सातव्या स्थानी भारत असून भारताकडे सझ्या 881 टन सोनं आहे.
भारतानंतर जपानकडे 846 तर नेदरलँड्सकडे 612 टन सोन्याचा साठा आहे.
तर टॉप टेन देशांमध्ये शेवटच्या नंबरला असलेल्या पोलंड देशाकडे 448 टन सोन्याचा साठा आहे.