Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी न्यूयॉर्कमधील नासाऊ कोलिझियम येथे अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केलं.
यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत केलेल्या भाषणात सांगितलेल्या 'ते' पाच मुद्दे.
पीएम मोदी म्हणाले, 'आज आमची भागीदारी संपूर्ण जगासोबत वाढत आहे. पूर्वी भारत समान अंतराचे धोरण अवलंबत असे. आज भारत जवळीकीचे धोरण अवलंबत आहे. आज जेव्हा भारत जागतिक व्यासपीठावर काही बोलतो तेव्हा जग ऐकते. 'हे युद्धाचे युग नाही' असे मी म्हटल्यावर त्याचे गांभीर्य सर्वांना समजले.
आज भारताची 5G बाजारपेठ अमेरिकेपेक्षा खूप मोठी आहे. पीएम मोदी म्हणाले की, आता भारत मेड इन इंडिया 6G वर काम करत आहे.
यादरम्यान, पंतप्रधानांनी अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना राष्ट्राचे राजदूत म्हणून संबोधित केले. ते म्हणाले की मला तुमची क्षमतांची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही सर्व माझ्यासाठी भारताचे सर्वात मोठे राजदूत आहात.
PM मोदी म्हणाले की तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्हाला अमेरिकेत मेड इन इंडिया चिप दिसेल. ही छोटी चिप भारताचे विकसित भारताचे स्वप्न नव्या उंचीवर नेईल. ही मोदींची गॅरंटी आहे.
भारतात आज खूप संधी आहेत. आता भारत आता संधींची वाट पाहत नाही, तर संधी निर्माण करतो' गेल्या 10 वर्षांत, भारताने प्रत्येक क्षेत्रात संधींसाठी एक लॉन्चिंग पॅड तयार केले आहे.