Narendra Modi Oath Ceremony Update : राणे, इराणींसह मोदी 2.0 मधील ‘या’ मंत्र्यांना पुन्हा लाल दिवा नाही...

Rajanand More

नारायण राणे

सिंंधुदुर्ग मतदारसंघातून विजयी. मागील सरकारमध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री होते. यावेळी त्यांचा समावेश झालेला नाही.

Narayan Rane | Sarkarnama

स्मृती इराणी

मागील दोन्ही टर्ममध्ये मंत्री होत्या. पण 2014 मध्ये अमेठीत पराभवानंतरही आणि 2019 मध्ये विजयी झाल्यानंतर मंत्रिपद. यावेळी पुन्हा पराभवाचा धक्का.

Smriti Irani | Sarkarnama

अनुराग ठाकूर

मागील सरकारमध्ये क्रीडा, माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम. यावेळी निवडणुकीत विजयी होऊनही मंत्रिपद नाही.

Anurag Thakur | Sarkarnama

मीनाक्षी लेखी

दिल्लीतून उमेदवारी नाकारली. मोदी 2.0 मध्ये सांस्कृतिक व परराष्ट्र खात्याच्या राज्यमंत्री म्हणून काम.

Minakshi Lekhi | Sarkarnama

राजीव चंद्रशेखर

मोदी सरकारमध्ये कौशल्य विकास व जलशक्ती राज्यमंत्री होते. केरळमधील तिरुवअनंतपुरम मतदारसंघात शशी थरूर यांच्याकडून पराभव.

Rajeev Chandrashekhar | Sarkarnama

दर्शना जरदोश

सलग दोन निवडणुकांत विजयी होऊनही 2024 मध्ये सूरत मतदारसंघातून उमेदवारी नाकारली. मोदी सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री होत्या.

Darshana Jardosh | Sarkarnama

महेंद्र नाथ पांड्ये

उत्तर प्रदेशातील चांदोली मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसल्याने मंत्रिपद नाही. मागील सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री होते.

Mahendra Nath Pandey | Sarkarnama

साध्वी निरंजन ज्योती

उत्तर प्रदेशातील फतेहपूर मतदारसंघात पराभव. मोदी सरकारमध्ये होत्या खाद्य प्रक्रिया उद्योग खात्याच्या राज्यमंत्री.

Sadhvi Niranjan Jyoti | Sarkarnama

अर्जून मुंडा

केंद्रीय जनजातीय कार्य मंत्री म्हणून पाच वर्ष कार्यभार सांभाळला. झारखंडमधील खुंटी लोकसभा मतदारसंघात पराभवाचा धक्का.

Arjun Munda | Sarkarnama

NEXT : महाराष्ट्रातील सर्वात तरुण, वयोवृद्ध खासदार कोण ?