Rajanand More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा आज (ता. 11 सप्टेंबर) वाढदिवस. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा देत कौतुकाचा वर्षाव केला आहे. पाहूयात 10 महत्वाचे विधाने...
मोहन भागवत हे नेहमीत एक भारत-श्रेष्ठ भारतचे खंदे समर्थक राहिले आहेत.
माझे मोहन भागवत यांच्या कुटुंबाशी जवळचे नाते आहे. त्यांचे वडील स्वर्गीय मधुकरराव भागवत यांच्यासोबत जवळून काम करण्याचे भाग्य मिळाले होते.
भागवतजींचे संपूर्ण आयुष्य नेहमीच प्रेरणा देत राहिले आहे. ते 1970 च्या दशकात प्रचारक बनले. प्रचारकाच्या महान परंपरेला मजबुती देणारे राहिले आहेत.
तत्कालीन काँग्रेस सरकारने आणीबाणी लादली, त्याकाळात त्यांनी प्रचारकाची जबाबदारी सांभाळली. प्रचारक म्हणून त्यांनी आणीबाणीविरोधी आंदोलनाला सतत मजबूत केले. त्यांनी विशेषकरून विदर्भात काम केले.
1990 च्या दशकात त्यांनी बिहारमधील गावांमध्ये आपल्या जीवनातील महत्वाची वर्षे घालवली. समाजाला सशक्त करण्याचे काम त्यांनी समर्पित भावनेने केले.
2009 मध्ये सरसंघचालक बनल्यापासून आजही ते अत्यंत ऊर्जेने काम करत आहेत. त्यांनी राष्ट्र प्रथम ही मूळ विचारधारा हमेशा सर्वोपरी ठेवली.
भागवतजींचे युवकांशी खास नाते आहे. त्यामुळे त्यांनी अधिकाधिक युवकांना संघ कार्यासाठी प्रेरित केले. लोकांशी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद असतो. बदलत्या काळानुसार खुले मन ठेवणे, हे त्यांचे वैशिष्ट्य.
संघाच्या 100 वर्षांच्या यात्रेत भागवतजींचा कार्यकाळ संघात सर्वाधिक परिवर्तनाचा कालखंड मानला जाईल. तो गणवेश परिवर्तन असो वा संघ शिक्षा वर्गांमध्ये बदल, अस अनेक महत्वपूर्ण बदल झाले.
आमच्यासारख्या स्वयंसेवकांचे हे भाग्य आहे की, मोहन भागवतजींसारखे दूरदर्शी आणि परिश्रमी सरसंघाचालक आमच्याजवळ आहे.
एक युवा स्वयंसेवक ते सरसंघचालकापर्यंतची त्यांची जीवनयात्रा त्यांची निष्ठा आणि वैचारिक दृढता दर्शविते.