Rashmi Mane
मोदींचे वेगवेगळे लूक नेहमीच व्हायरल होत असतात. दरवर्षी प्रजासत्ताक दिनालाही मोदींचे वेगळे लूक पाहायला मिळतात.
2021च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जामनगरची पगडी घातली होती.
प्रजासत्ताक दिन 2020
2020ला प्रजासत्ताक दिन सोहळ्यात बांधणीचा फेटा बांधला होता.
2019ला पंतप्रधान मोदींनी पिवळ्या आणि लाल रंगाचा फेटा बांधला होता.
2018 मध्ये 69 व्या प्रजासत्ताक दिनाला मोदींनी लहरीया फेटा बांधला होता.
2017 च्या 68 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात मोदींनी गुलाबी रंगाचा फेटा बांधला होता.
2016 मध्ये 67 व्या प्रजासत्ताक दिनाला पंतप्रधान मोदींनी पिवळ्या रंगाच्या फेट्यावर हिरव्या रंगाच्या बारीक रेषा असलेला फेटा परिधान केला होता.