मोदींच्या कार्यक्रमात ‘तांत्रिक’ घोळ, थेट सचिव पदावरून IAS महिला अधिकाऱ्याची उचलबांगडी

Rajanand More

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ सप्टेंबर रोजी राजस्थानच्या दौऱ्यावर होते. बांसवाडा येथे एका शासकीय कार्यक्रमात त्यांनी विविध योजनांचे लोकार्पण केले.

Narendra modi | sarkarnama

तांत्रिक घोळ

पंतप्रधान मोदी स्टेजवर आल्यानंतर लगेचच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. कार्यक्रमात ऑडिओ-व्हिज्युअल यंत्रणेत अडचणी आल्या. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यानही अडथळे आले.

Narendra Modi | Sarkarnama

गंभीर दखल

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमादरम्यान आलेल्या अडचणींची राजस्थान सरकारने गंभीर दखल घेत राज्याच्या माहिती तंत्रत्रान विभागाच्या सचिव अर्चना सिंह यांचा तडकाफडकी पदावरून हटवले.

IAS Archana Singh | Sarkarnama

दिल्लीतून नाराजी

पंतप्रधानांचा कार्यक्रम देशपातळीवर लाईव्ह दाखविला जातो. पण तांत्रिक अडचणी आल्याने दिल्लीतून राजस्थान सरकारकडे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते.

IAS Archana Singh | Sarkarnama

प्रशासकीय कारण

अर्चना सिंह यांना पदावरून हटवताना सरकारने प्रशासकीय कारणास्तव बदली केली जात असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांना बदली करताना कोणतेही पद दिले गेले नव्हते.

IAS Archana Singh | Sarkarnama

कोण आहेत अर्चना सिंह?

अर्चना सिंह हे २००८ च्या तुकडीच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. राजस्थान सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

IAS Archana Singh | Sarkarnama

उच्चशिक्षित

अलाहाबाद विद्यापीठातून बीएसस्सी आणि एमएसस्सीचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली होती. 

IAS Archana Singh | Sarkarnama

कारवाई

आयएएस अर्चना सिंह यांची प्रशासकीय पातळीवर चौकशी केली जाऊ सकते. त्यांची कमी महत्वाच्या पदावर बदली केली जाऊ शकते.

IAS Archana Singh | Sarkarnama

NEXT : औकातीत राहा..! जिल्हाधिकारी थेट भाजप आमदाराला भिडले, कोण आहेत?

येथे क्लिक करा.