Rajanand More
आयएएस संजीव श्रीवास्तव यांची डॅशिंग अधिकारी अशी ओळख आहे. ते मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र सिंह कुशवाह आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. दोघांनीही एकमेकांवर जोरदार निशाणा साधला होता.
शेतकऱ्यांशी संबंधित समस्या घेऊन आमदार जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी केले होते. ते बाहेर ने आल्याने चिडलेल्या आमदारांनी गेट उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर श्रीवास्तव बाहेर आले अन् दोघांमध्ये वादावादी झाली. औकातीत राहा, असे जिल्हाधिकारी त्यांना म्हणाले.
आमदारही चिडले आणि त्यांनी तू मला ओळख नाहीस, असे म्हटले. त्यावर मी वाळू चोरी होऊ देणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणतातच आमदारांनी तूच सर्वात मोठा चोर असल्याचे वादग्रस्त विधान केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे संतापलेल्या आमदारांनी जागेवरच बसून आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.
श्रीवास्तव हे मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उपजिल्हाधिकारी बनले होते. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी आयएएस म्हणून प्रमोट करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत विविध महत्वपूर्ण पदांवर काम केले आहे.
जुलै 2025 मध्ये एका परीक्षेदरम्यान पाहणीसाठी गेलेल्या श्रीवास्तव यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या थोबाडीत लगावली होती. त्यावरून बराच वादही निर्माण झाला होता.
तहसीलदार माला शर्मा यांनी श्रीवास्तव यांच्यावर मानसिक छळाचे रोप केले होते. याबाबतची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती.