Sunil Balasaheb Dhumal
भाजपच्या एका नेत्यांने भाजप ४०० पार गेले तर संविधान बदलणार असल्याचे विधान केले होते.
त्यावरून इंडिया आघाडीने भाजपवर टीकेची झोड उठवत संविधान धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली.
इंडियातील घटक पक्षांच्या या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सडेतोड उत्तर दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले तरी संविधान संपवू शकत नाहीत, असे मोदी म्हणाले.
निवडणूक येते त्यावेळी संविधानाच्या नावावर खोटे बोलणे ही इंडिया आघाडीची फॅशन झाली आहे.
काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांना निवडणुकीत हरवले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने भारतरत्न मिळू दिला नाही.
देशात पहिल्यांदा संविधान दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. तर काँग्रेसने त्यास विरोध केला होता.