Narendra Modi Salary : मोदींना महिन्याला किती मिळतो पगार? पाहा एका क्लिकवर!

Chetan Zadpe

उमेदवारी दाखल -

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. मोदी यांनी वाराणसी येथून नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रतिज्ञापत्रात माहिती -

मोदींनी उमेदवारी अर्जासोबत एक प्रतिज्ञापत्रदेखील सादर केले आहे. यामध्ये त्यांच्या संपत्तीसंबंधी माहिती देण्यात आली आहे.

3 कोटींची संपत्ती -

पंतप्रधान मोदींच्या या प्रति्ज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 3.02 कोटी एवढी आहे. सोबतच त्यांच्याकडे रोख स्वरुपात 52 हजार 920 एवढी रक्कम आहे.

ना घर-ना गाडी -

मोदींकडे स्वतःचं घर, गाडी, जमीन काहीही नाही.

संपत्तीत वाढ -

2018-19 च्या प्रतिज्ञात्रानुसार मोदींचे वार्षिक करपात्र उत्पन्न 11 लाख एवढे होते. ते आता 2022-23 मध्ये वाढून 23.5 लाख एवढे झाले आहे.

फिक्स डिपॉझिट -

स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत मोदींची 2.85 कोटी एवढी फिक्स डिपॉझिट आहे. तसेच 9.12 लाख रुपये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेत गुंतवलेले आहेत.

चार अंगठ्या -

मोदींकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. या अंगठ्यांचं वजन 45 ग्रॅमच्या आसपास आहे. मोदींकडील या अंगठ्यांची किंमत 2 लाख 67 हजार 750 एवढे आहे.

51 लाख रुपयांची वाढ -

मागील पाच वर्षात नरेंद्र मोदींची संपत्तीमध्ये साधरण 51 लाख रुपयांची वाढ झाली आहे.

मासिक वेतन किती -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मासिक पगारा 2 लाख रुपये इतका मिळतो. यामध्ये वेतनामध्ये मूळ वेतन, दैनिक भत्ता, खासदार भत्ता आणि इतर अनेक भत्तांचा यात समावेश आहे.

NEXT : 'मॉडेल' पेक्षा कमी नाही 'या' IAS अधिकारी, फोटो एकदा बघाच!