Chetan Zadpe
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष संरक्षण गटाचं (एसपीजी) संरक्षण देण्यात आलं आहे. पंतप्रधानांभोवतीचे पहिले सुरक्षा वर्तुळ एसपीजी जवानांचे असते.
पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात जवानांना अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या निकषांवर प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्याकडे ‘एमएनएफ 2000 असॉल्ट रायफल, ऑटोमॅटिक गन आणि सतरा एम रिव्हॉल्व्हर सारखी आधुनिक शस्त्रे असतात.
१) एसपीजी
२) एएसएल,
३) राज्य पोलिस
४) स्थानिक प्रशासन.
पोलिसांच्या निर्णयावर एसपीजी अधिकारी देखरेख ठेवतात. केंद्रीय एजन्सी ‘एएसएल’ पंतप्रधानांच्या स्थळ आणि मार्गावर सुरक्षा तपासणी करते.
पंतप्रधानांच्या जवळ येणाऱ्या लोकांची तपासणी एसपीजी घेते आणि पंतप्रधानांच्या आजूबाजूची सुरक्षा पाहते. स्थानिक प्रशासन पोलिसांच्या बरोबरीने काम करतात.
अॅडव्हान्स सिक्युरिटी लायझन टीम (एएसएल) पंतप्रधानांच्या दौऱ्याशी संबंधित प्रत्येक माहितीसह अपडेट असते.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी कार्यक्रमस्थळाच्या मार्गापासून ते कार्यक्रमस्थळापर्यंतच्या सुरक्षेशी संबंधित नियम स्थानिक पोलिस ठरवतात.
एसपीजी कमांडोंचा पंतप्रधानांभोवती नेहमीच गराडा असतो. हल्ला झाल्यास, त्यांचे काम पंतप्रधानांना घेरणे आणि त्यांना सुरक्षित ठेवणे तसेच हल्लेखोराला पकडणे हे आहे.