Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर पोहोचले आहेत. ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे कारण चार दशकांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.
दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मंगळवारी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे पोहोचले.
या भेटीनंतर, दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिला ऑस्ट्रिया दौरा आहे.
मात्र, याआधी त्यांनी ऑस्ट्रियाच्या कुलपतींची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांची भेट घेणार आहेत.
या दौऱ्यात मोदी भारत आणि ऑस्ट्रियातील उद्योगपतींना भेटणार आहेत.
त्यासोबत व्हिएन्ना येथे भारतीयांशी संवाद साधणार आहेत. या भेटीमुळे ऑस्ट्रिया आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे.
ऑस्ट्रिया आणि भारत या भेटीमुळे भारताला पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान, स्टार्ट-अप आणि मीडिया आणि मनोरंजन यांसारख्या क्षेत्रांमध्ये फायदा होणार आहे.