Akshay Sabale
वायनाडमध्ये भूस्खलन होऊन उद्ध्वस्त झालेल्या लोकांच्या बचाव व पुनर्वसन कार्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी येथील भूस्खलनग्रस्त भागाला भेट देऊन बचावलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
मोदी यांनी सांगितले की, ही दुर्घटना घडली तेव्हापासून मी इथल्या संपर्कात असून सातत्याने माहिती घेत आहे.
भूस्खलन पीडितांना किती भीषण संकटाचा सामना करावा लागला, हे मी पीडितांच्या तोंडून ऐकले आहे. निसर्गाचे रौद्ररूप भूस्खलनाच्या निमित्ताने दिसून आले, असं मोदींनी म्हटलं.
भूस्खलनग्रस्त नागरिकांसाठी उभारलेल्या मदत छावणीलाही मोदी यांनी भेट दिली.
मोदी यांनी पीडितांच्या डोक्यावरून व खांद्यावरून मायेचा हात फिरवला तेव्हा पीडितांचा अश्रूंचा बांध फुटल्याचे दिसून आले.